57 विद्यार्थी इस्रो सहलीला जाणार

0

जळगाव: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची रुची निर्माण व्हावी तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च तंत्रज्ञान संस्था बघता याव्यात यासाठी ,मागील वर्षी नोबेल फाउंडेशन आणी भरारी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा नुकतीच घेण्यात आली. या परीक्षेच्या मुलाखतीचा अंतिम निकाल रविवारी संध्याकाळी जाहीर करण्यात आला. याअंतर्गत राज्यभरातील शहरी तसेच ग्रामीण भागातील 57 विद्यार्थ्यांची विनामूल्य इस्रो सहलीसाठी निवड करण्यात आली आहे. राज्यभरातून 5200 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी 319 विद्यार्थ्यांची मुलाखतीसाठी निवड झालेली होती. ज्यातून 57 विद्यार्थ्यांची अंतिम यादीत निवड झालेली आहे. यात जळगाव येथील ओरियन सीबीएससी स्कूल इयत्ता पाचवीचा विद्यार्थी करुणेश महाजन राज्यात प्रथम आलेला आहे. इयत्ता आठवी ते दहावीच्या गटात सेंट मेरी स्कूल अमळनेरचा विद्यार्थी हिमांशू पेंढारे गुणवत्ता यादीत प्रथम आला आहे.या विद्यार्थ्यांना नोबेल फाऊंडेशन’ तर्फे इसरो अहमदाबाद, आयआयटी गांधिनगर आणि आयआयएम अहमदाबाद या सर्वोच्च शिक्षण व तंत्रज्ञान संस्थांना अभ्यास सहलीसाठी नेण्यात येणार आहे.

यंदाची नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा जून महिन्यात होणार असून अर्ज भरण्याची सुरुवात 10 मार्च पासून होणार आहे. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन, दीपस्तंभ फाउंडेशन, जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पगारिया ऑटो, महाविर क्लासेस जळगाव ,कॉलेज ऑफ इंजीनियरिंग बांभोरी, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल अमळनेर आणि आमदार राजूमामा भोळे यांचे सहकार्य लाभत आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना नोबेल चे संस्थापक जयदीप पाटील म्हणाले की, 57 विदयार्थी इस्रो साठी निवड होणे ही एक वैज्ञानिक क्रांती आहे. खेड्या पाड्यातील मुलांमध्ये विज्ञान तंत्रज्ञान बाबत गोडी निर्माण होत आहे. नोबेल च्या कार्याला आता फळ मिळायला लागले आहे. डॉ एपीजे कलमांची स्वप्नं पूर्ण करणारी युवा पिढी यातून निर्माण होईल

इस्रो सहलीसाठी निवड झालेले विद्यार्थी-
करुणेश महाजन (जळगाव), श्रेयस पाटील (कोल्हापूर), प्रसन्न चौधरी (अमळनेर), तनिषा ढोले (धुळे), साई धोते (यवतमाळ), आदिती वीरकर (कराड, जि. सातारा), मानस पाटील (जळगाव), अथर्व पाटील (खापर, जि. नंदुरबार ), ओम कुट्टे (कराड, जि. सातारा), विधी नेहते (जळगाव), युगंधर पाटील (सांगली), अभिनव वाघ (धुळे), प्रांजल बोरसे (धुळे), परशु सरोदे (जळगाव), शुभम देशमुख (चाळीसगाव), पूर्वेश काकुस्ते (दातर्ती), वेदांत शेवाळे (कुंभोज, कोल्हापूर), अथर्व बेर्गळ (कोपरगाव, जि. चाळीसगाव), अनुजा यादव (दहिवडी, जि. सातारा), लोकेश पाटील (अमळनेर), वैभव पाटील (पाचोरा) शाश्वत रवींद्र देवरे (धुळे), आरुष दिपक बागडिया (कराड, जि. सातारा), प्रांजल अविनाश पाटील (कोल्हापूर), ललित सोमनाथ महाजन (हिंगोणे,जि. जळगाव), ऋषिकेश ईश्वर काव्हळे (शेलवड), प्रणित राजेंद्र भाटिया (धरणगाव), पंकज भटू चौधरी (सोनगीर, जि. धुळे), ऋग्वेद प्रशांत सोनवणे (चोपडा),पोर्णिमा राम जांबभोळे (जावळा बाजार), मंजिरी सुरेश पाटील (मोहाडी, ता. जि. धुळे), तुषार गजानन मगर (जानेफळ), जान्व्ही रविंद्र पाटील (म्हसावद), भूषण चिंतामण बडगुजर (धरणगाव), हिमांशु निरंजन पेंढारे (अमळनेर),चेतना योगराज पाटील (अमळनेर),अर्चित राहुल पाटील (जळगाव), प्रणव किशोर सोनार (जळगाव), भावेश गोपाल माळी (नशिराबाद, जि. जळगाव) ,अर्णव नितीन पाटील (पाचोरा), कौशल कुंदन वायकोळे (भुसावळ), निलेश आशिष सहापुरे (पंढरपूर), अनिष अनिल तांबोळी (पंढरपूर), धनश्री राहुल लाहोटी (जवळा बाजार), वैभवी सुभाष पवार (कुंभोज, जि. कोल्हापूर), प्रांजल रवि राय (पाचोरा), दिपांशु विक्रम अग्रवाल (मलकापूर), प्राची पंकज जानवडकर(उद्गीर, जि. नांदेड), सोमनाथ भागवत म्हस्के (जानेफळ), वैभव भिकन बडगुजर (पिंपळगाव हरेश्वर), श्रुष्टी प्रेमराज विसावे (धुळे), हर्षदा रवींद्र ठाकरे (अमळनेर), ओम चंद्रकांत थोरात (जळगाव), स्वराली संदीप साळुंखे (अमळनेर), खिलेश विनायक पाटील (जळगाव), भुषण अजय भामरे (शिंदखेडा), साईनाथ नरसारेड्डी चेवटे (नांदेड)