शिवसेना मध्यवर्ती कार्यालय डोंगरगाव रोड येथे शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) ५७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

शहादा : शिवसेना मध्यवर्ती कार्यालय डोंगरगाव रोड येथे शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) ५७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.शरद पाटील, आमदार तथा जिल्हा प्रमुख आमश्या दादा पाडवी,जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरुण चौधरी,जिल्हा प्रमुख गणेशजी पराडके यांचा मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

रयतेचे राजे छत्रपती शिवराय ,हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, वात्सल्य मुर्ती मिनाताई ठाकरे यांचा प्रतिमेस पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले.

जिल्हा उपसंघटक मधुकर मिस्तरी,माजी उपजिल्हा प्रमुख भगवान अलकरी, ता.प्रमुख राजेंद्र लोहार,शहरप्रमुख अब्दुल कादिर, जेष्ठ शिवसैनिक सुभाषभाई पाटील यादव कुवर, उप.ता.प्रमुख.अविनाश पाटील, उत्तम पाटील, डॉ. सागर पाटील,बापु सुर्यवंशी. रमेश कुवर,माजी शहर प्रमुख सुरेश मोरे, बापु चौधरी.दिलिप पाटील, ता.संघटक गणेश चित्रकथे,प्रविण सैंदाणे, प्रकाश शिरसाठ,झुलाल ठाकरे,प्रशांत नाईक,निलेश पाटील, रुषिकेश शिवदे,दिपक खेडकर, वसंत पवार,रविंद्र पाटील, अमर पावरा, राजेंद्र पाटील, दिपक उखळदे,जयसिंग ठाकरे,आमिन पिंजारी,रजाभाई,कामिल शेख,मोहसीन शहा, अशपाक शहा,अलमास बेलदार, फारुख खाटीक, शोएब खाटीक, फैजान शेख,बाबा शेख,ईम्रान शेख,अजहर शेख,शाकीब शेख,तानाजी कोळी, आदी शिवसैनिक उपस्थित होते.