6 वर्षासाठी 65 बंडखोर भाजपातून निलंबित

0

नागपूर । महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांना तिकिट मागणार्‍यांची अधिक संख्या होती.ज्यांना तिकिट मिळाले नाही. त्यांनी पक्ष विरोधी बंड पुकारले. तर काहींनी अपक्ष वा अन्य पक्षाचा हात पकडून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला बंडखोरांनी आव्हान निर्माण केले. त्यामुळे पक्षाने आशा बंडखोरांना 6 वर्षासाठी भाजपातून निलंबित केले आहे. या निलंबित केलेल्याची संख्या 65 वर गेली आहे.

उमेदवारीच्या कारणाने अनेकांची बंडखोरी

नागपूर हा मुख्यंमत्री देवेंद्र फडवणीस व केंद्रीय महामार्ग व जलपरिवहन मंत्री नितीन गडकरी यांचा मतदार संघ आहे. याठिकाणी गडी व वाड्यावरून येथील महापालिकेचे सर्व सुत्र हालविण्यात येत आहे,असे असतांना उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक जण इच्छुक होते, त्यातील अनेकांना तिकीटे मिळाले नाही . त्यामुळे त्यांनी पक्षाविरोधी बंडखोरी करत अपक्ष किंवा अन्य पक्षाशी हात मिळविणी करून बंड पुकारले. हे बंड शमविण्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्न केले.मात्र नेत्यांना यश आले नाही.ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचे काम करण्याचा ठपका पक्षाने कारवाई करणार्‍यांवर ठेवला आहे. त्यांच्या या पक्षविरोधी कारवायांमुळे पक्षाने त्यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेतला.शेवटी पक्षाच्या नेत्यांनी बंडखोरी करणार्‍या 46 नेते व कार्यकर्ते यांच्या कारवाईचा पहिला बडगा उचविला. त्यांनर 8 जणांवर कारवाई केली. आता ती संख्या 65 वर गेली आहे.