6 नव्हे तर 7 एप्रिलला होणार आयपीएलचे उद्घाटन

0

मुंबई । आयपीएलच्या 11 व्या सत्राचा उद्घाटन समारंभ एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. आता 6 एप्रिल नव्हे तर 7 एप्रिलला आयपीएलचे उद्घाटन होणार आहे. ओपनिंग सेरेमनी होणार आहे. याशिवाय उद्घाटन समारंभाचे बदलण्यात आले आहे. सुरुवातीला हा कार्यक्रम क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये होणार होता. मात्र, आता हा सोहळा वानखेडेवर होणार आहे.

या सोहळ्याचे बजेटही 20 कोटी रुपयांनी कमी करण्यात आले आहे. आयपीएलच्या 11व्या सत्रातील सामन्यांना 7 एप्रिलपासून सुरुवात होते आहे. पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि दोन वर्षाच्या बंदीनंतर परतलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात रंगणार आहे. आयपीएलमध्ये दोन वेळा जेतेपद जिंकणारा चेन्नई सुपर किंग्ज दोन वर्षांच्या बंदीनंतर पुन्हा खेळण्यासाठी सज्ज झालाय. चेन्नईचे कर्णधारपद महेंद्रसिंग धोनीकडे देण्यात आले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार, आयपीएलचा उद्घाटन समारंभ सामना सुरु होण्याआधी होईल. याआधी या सोहळ्यासाठी आयपीएल गर्व्हनिंग काऊंसिलने 50 कोटी रुपयांचे बजेट ठेवले होते. मात्र, आता 30 कोटींपर्यंत बजेट कमी करण्यात आलेय. आयपीएलच्या बाकी वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही.