कार तलावात कोसळून सहा मुलांचा मृत्यू

0

पाटणा : बिहारमधील अररिया जिल्ह्यात एक कार तलावात कोसळल्याने सहा चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सकाळी सहा वाजताच्या सुमारास झाडावर आपटून गाडी तलावात पडली. घटनास्थळी बचावपथक पोहोचले असून एका मुलाला वाचवण्यात यश आले आहे.

#SpotVisuals: 6 children dead, 1 rescued after a car they were travelling in fell into a pond in Ararriya's Tarabadi #Bihar pic.twitter.com/lJMpQYyXVF
— ANI (@ANI) June 19, 2018

अररिया येथील ताराबडी परिसरात हा अपघात झाला. कुर्साकाटामधील चिकनी गावात लग्न समारंभ गेले होत. ते आटोपल्यानंतर वऱ्हाड्यांची कार डोरिया गावी निघाली होती. त्यावेळी रस्त्यावर आंबे तोडणाऱ्या लहान मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार झाडावर आपटून तलावात कोसळली. या कारमध्ये एकूण १० मुले होते. त्यात दहापैकी सहा बालकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सात ते चौदा वर्ष वयोगटातील चिमुरड्यांचा समावेश आहे. लहानग्यांचे मृतदेह पाहून त्यांच्या पालकांनी एकच आक्रोश केला. चौघा जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.आहे.