१५ दिवसात सहा दिवस बँका बंद !

0

नवी दिल्ली: ऑक्टोबर महिन्यातील पुढील 14 दिवसांपैकी 6 दिवस देशातील बँका विविध कारणांमुळे बंद राहणार आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीच्या मोसमात खोळंबा होणार आहे. 31 ऑक्टोबर रोजी विविध कारणांमुळे देशातील बँका बंद राहणार आहेत. तत्पूर्वी 22 ऑक्टोबर रोजी बँकांच्या विलिनिकरणाविरोधात कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी संपाची हाक दिली आहे. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघ आणि भारतीय बँक कर्मचारी परिसंघ या संघटनांनी पुकारलेल्या या संपाला भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता संप झाल्यास 22 ऑक्टोबर रोजी बँका बंद राहतील.

20 ऑक्टोबर रोजी रविवार असल्याने बँका बंद राहतील. तर 26 ऑक्टोबरला चौथा शनिवार असल्याने बँकांचे कामकाज बंद राहील. त्यानंतर 27 ऑक्टोबरपासून दिवाळी सुरू होत आहे. 27 ऑक्टोबर रोजी रविवार आहे. 28 ऑक्टोबर रोजी बलिप्रतिपदा (पाडवा) असल्याने देशाच्या विविध भागात बँका बंद राहतील. तर 29 ऑक्टोबर रोजी भाऊबीजेनिमित्त बँकांचे कामकाज बंद राहील. त्यामुळे पुढील 14 दिवसांपैकी केवळ 8 दिवस बँकांचे कामकाज सुरू राहील. त्यामुळे योग्य नियोजन करून बँकांमधील कामकाज आटोपून घेताना सर्वसामान्यांची धावपळ होणार आहे.