बीड : बीड जिल्हा परिषदेच्या 6 सदस्यांना अपात्र ठरविणारा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कायम ठेवला आहे. यामुळे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का मनाला जात आहे. सोबतच हा माजी मंत्री सुरेश धस यांना देखील धक्का बसला आहे.
जिल्हा परिषदेच्या 6 सदस्यांना अपात्र ठरविण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा पंकजा मुंडेंचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने रद्दबातर ठरवला आहे. त्यामुळे आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत या 6 सदस्यांना मतदानही करता येणार नाही. बीड जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाचा आदेश डावलत या 6 सदस्यांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केले होतं. सुरेश धस गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहा सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले होते.
या आठवड्यात पंकजा मुंडे यांच्यासाठी हा दुसरा धक्का आहे. यापूर्वी त्याचे मानस बंधू रमेश कराड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. कराड यांना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे.