60 लाख खर्चुनही पशुवैद्यकीय रुग्णालयाचे काम निकृष्ट

0

सोयगाव। येथील प. स. मधील बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून तालुक्यात झालेल्या बांधकामाचे तीनतेरा वाजले असून काही कामे फक्त कागदोपत्री दाखवून बिले लाटण्यात आली आहे. या सर्व कामाची वरिष्ट पातळीवर चौकशी करावी अशी मागणी सोयगाव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष योगेश हरी पाटील यांनी केली आहे. मागणीचे निवेदन पालकमंत्री रामदास कदम व ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांना देण्यात आले आहे. सोयगाव शहरातील न्यायालयाच्या शेजारी पशुवैद्यकीय दवाखाण्याची जुनी इमारत जीर्ण होती. या इमारतीच्या दुरुस्तीसाठी व पशुधनाला वेळेवर उपचार मिळावा यासाठी शासनाने नवीन इमारतसाठी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता.

बांधकामाचा स्लॅब वाहू लागला असून इमारतीचा रंगही उडाला आहे. इमारतीला दरवाजे खिडक्या या जुन्या बसवण्यात आलेल्या आहेत. निधी खर्च करुनही काम निकृष्ट दर्जाचे असल्याने शासनाचा निधी वाया गेला आहे. यास कनिष्ट अभियंता यु. आर. पवार जबाबदार असून त्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. पशुवैधकीय दवाखान्याच्या नवीन इमारती साठी शासनाने 60 लाख रुपये निधी दिला होता. या इमारतीचे बांधकाम रेणुका कंन्ट्रकशन कंपनीला दिले होते. इमारतीचे काम दर्जेदार करून घेण्यासाठी जबाबदारी कनिष्ट अभियंता यु.जी पवार यांची होती. परंतु ठेकेदार व कनिष्ट अभियंता यांनी संगणमत करून पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे करून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारला आहे. संपूर्ण मालमत्तेची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी अखिल भारीय भ्रष्टाचार विचार न्याय मंचचे तालुका सचिव शालिक देसाई यांनी केली.

धरणगाव येथे युवकांचा शिवसेनेत प्रवेश
धरणगाव। येथे शिवसेनेत 30 कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. सोमवारी 3 रोजी धरणगांव येथील जय बजरंग चौक, मराठे गल्ली, पाटील समाज मढी येथे कार्यकर्त्यांनी शिसेनेत प्रवेश केला. त्यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबरावजी वाघ, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, नगरसेवक वासुदेव चौधरी, राजेंद्र महाजन, पप्पू भावे, सुरेश महाजन, भागवत चौधरी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. राहुल पाटील, घनश्याम पाटील यांच्यासह 30 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.