60 इच्छूक वधू-वरांनी दिला मेळाव्यात परीचय

0

भुसावळात सार्वजनिक वधू-वर परीचय मेळावा उत्साहात

भुसावळ- शहरातील गंगाराम प्लॉटमध्ये सोमवारी मनिषा जनसेवा बहुउद्देशीय संस्थेतर्फे सार्वजनिक वधू-वर परीचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्यात 40 इच्छूक वर तर 20 इच्छूक वधूंनी आपला परीचय दिला. प्रमुख पाहुणे म्हणून पुरवठा अधिकारी राठोड होते. यावेळ वधू-वर परीचय पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सर्व समाजाने एकत्र येऊन, असे मेळावे घेणे काळाची गरज असून जाती-पातीचे बंधन न पाळता सर्व समाजातील लोकांनी उपवर-वधूंचे विवाह चांगले स्थळ पाहून करावे, असे राठोड म्हणाले.

यांची मेळाव्याला प्रमुख उपस्थिती
मनिषा जनसेवा बहुउद्देशीय संस्थाध्यक्ष मोरेश्वर बोरोले, उपाध्यक्ष दीपक पाटील, नितीन धांडे, संतोष सोनवणे, मराठा समाज वधू-वर सुचक अध्यक्ष गोविंदा पाटील, शिलाम्बरी जमदाडे, रवींद्र ठाकूर, मयुर साळवे, सविता सुरते, मनिषा कोळी, संतोष येवले, रवींद्र पाटील, एस.बी.पाटील आदी उपस्थित होते. मेळाव्यासाठी बर्‍हाणपूर, खंडवा, अकोला, अमरावती, भुसावळ, जळगाव, जामनेर, यावल, फैजपूर, रावेर येथिल युवकांची उपस्थिती होती. दरम्यान, मेळावा यशस्वीतेसाठी संतोष सोनवणे, मयुर साळवे, दीपक पाटील, गोविंदा पाटील, बाबूराव पाटील, लक्ष्मण वराडे यांनी परीश्नम घेतले. सूत्रसंचालन शिलाम्बरी जमदाडे तर आभार दीपक पाटील यांनी मानले.