नवी दिल्ली : भारतीय सैन्याला लवकरच 600 ड्रोन मिळणार आहेत. याद्वारे चीन बॉर्डरवर होणार्या हालचालींवर नजर ठेवली जाईल. हे ड्रोन खरेदी करण्यासाठी 950 कोटी खर्च केला जाणार असून सर्व ड्रोन बॉर्डर पोस्ट सांभाळणार्या इन्फन्ट्री बटालियना दिले जातील.
5 हजार मीटर उंचीपर्यंत हे ड्रोन उडू शकतात. ड्रोनद्वारे 10 किलोमीटर पर्यंतच्या परिसरावर नजर ठेवणे शक्य होणार आहे. दहशतनवाद्यांनी घुसखोरी करू नये तसेच सीमेवर गस्त घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सैन्यदल सीमेच्या पलिकडून येणार्या दहशतवाद्यांना सीमेवरच पकडण्याचा विचार करत आहे. एका वर्षात लष्कराने 175 हून अधिक दहशतवाद्यांना मारले आहे.