62 वर्षीय अनोळखीचा मृतदेह आढळला

Death of an unknown person near Nahata Chauphuli in Bhusawal भुसावळ : शहरातील नाहाटा चौफुलीजवळील हॉटेल स्वराजजवळ 60 ते 62 वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू झाला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

अनोळखीची ओळख पटवण्याचे आवाहन
शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास हॉटेल स्वराजनजीक अनोळखी 60 वर्षीय इसम मयत अवस्थेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी धाव घेत पाहणी केली. हवालदार रवींद्र सपकाळे करीत आहेत.