६३ लाख रुग्ण कोरोनामुक्त

0

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून भारतातील कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरतांना दिसत आहे. दररोज ८५ हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत होते, मात्र आता ६५ हजाराच्या खाली रुग्ण संख्येचे नोंद होत आहे. मागील २४ तासात ६३ हजार ५०९ नवे करोना रुग्ण आढळले असून ७३० जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबत देशातील करोनाबाधित रुग्णसंख्या ७२ लाख ३९ हजार ३९० वर पोहोचली आहे. कोरोना बाधितांच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या स्थानी आहे. मात्र रिकव्हरीच्या बाबतीत भारत जगात अव्वल आहे. देशात सद्या ८ लाख २६ हजार ८७६ अॅक्टिव्ह रुग्ण आहे. टक्केवारीत मोजायचे झाल्यास सध्या ११ टक्के रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. ६३ लाख १ हजार ९२८ (८७ टक्के) रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्याची संख्या १ लाख १० हजार ५८६ इतकी झाली आहे.

बुधवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रचंड मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. बुधवारी ५५ हजार ३४२ नवीन रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आली होती.