A farmer of Kusumba village committed suicide by drinking the solution रावेर : तालुक्यातील कुसुंबा येथील 66 वर्षीय शेतकर्याने सोल्यूशन प्राशन करीत आत्महत्या केली. रविवार, रोजी ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे ठोस कारण समोर आले नसलेतरी शेतकर्यावर झालेल्या पाच लाखांच्या कर्ज विवंचनेत ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत रावेर पोलिसात नोंद करण्यात आली आहे. सुधीर राजाराम जावळे (66) असे मयत शेतकर्याचे नाव आहे.
घरातून झाले होते बेपत्ता
कुसुंबा खुर्द येथील सुधीर राजाराम जावळे (66, रा.कुसुंबा खुर्द) हे शनिवारपासून घरच्यांना काहीही न सांगता निघून गेले होते. मुलांनी त्यांचा शोध घेतला असता त्यांच्याच शेतातील लिंबाच्या झाडाखाली मृतदेह आढळला. शेतकर्याने सोल्यूशन प्राशन करीत आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. शेतकर्याकडे साडे सहा एकर शेती असून त्यात केळी लागवड करण्यात आली असून पाच लाखाचे कर्ज असल्याचे त्यांचा मुलगा राहुल जावळे यांनी सांगितले.