नवी दिल्ली: 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात नुकतेच विविध पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. दिग्दर्शन, संगीत, पार्श्वसंगीत, कॉरीओग्राफी आदी प्रकारात पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. चित्रपट सृष्टीत नॅशनल फिल्म अवार्डला विशेष महत्त्व आहे. जाणून घेऊया कोण ठरले विजेते.
बेस्ट अॅक्टर : आयुष्यमान खुराना( बधाई हो), विकी कौशल(उरी)
‘बेस्ट हिंदी फिल्म अवार्ड’: अंधाधुंद चित्रपटाला ‘बेस्ट हिंदी फिल्म अवार्ड’ जाहीर झाला आहे. अंधाधुंद चित्रपट श्रीराम राघवन यांनी दिग्दर्शित केले आहे. यात आयुष्यमान खुराणा मुख्य भूमिकेत होता. बॉलीवूडमध्ये या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. चित्रपट सृष्टीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराला विशेष महत्त्व आहे.
बेस्ट सपोर्टिंग अवार्ड: विनोद चित्रपट ‘बधाई हो’मधील अभिनेत्री सुरेखा सिक्री यांना बेस्ट सपोर्टिंग अवार्ड देण्यात आला आहे.
बेस्ट म्युसिक डायरेक्शन अवार्ड: पद्मावत चित्रपटासाठी संजय लीला भंसाली यांना बेस्ट म्युसिक डायरेक्शन अवार्ड जाहीर झाला आहे.
बेस्ट कॉरीओग्राफर: पद्मावत चित्रपटातील ‘घुमर’गाण्यासाठी बेस्ट कॉरीओग्राफरचा अवार्ड देण्यात आला आहे.
बेस्ट सिंगर (पुरुष): आघाडीचा गायक अरिजित सिंगला बेस्ट सिंगरचा किताब मिळाला आहे. पद्मावत चित्रपटासाठी त्याचा सन्मान झाला आहे.