660 प्रकल्पाचे मुख्य अभियंता विवेक रोकडेंचे कंत्राटदारांकडून स्वागत

0

भुसावळ- दीपनगर सुपरक्रिटीकल 660 मेगावॅट प्रकल्पात नव्यानेच रूजू झालेले मुख्य अभियंता विवेक रोकडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मंगळवारी वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेतर्फे त्यांच्या दालनात सत्कार करण्यात आला. विस्तारीत 660 मेगावॅट प्रकल्पात सुपरक्रिटीकल प्रकल्पात मुंबई येथून आलेले मुख्य अभियंता रोकडे यांनी नुकताच आपला पदभार स्विकारला. त्यांनी प्रकल्पाचे काम वेळेच्या आधी व्हावे, अशा सूचना अधिकारी तसेच भेल कंपनीच्या अधिकार्‍यांना दिल्या. या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या विकासात अजून भर पडणार असून परीसरातील बेरोजगारीचा प्रश्नही सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुबारक पठाण, प्रदेश सचिव प्रकाश सरदार, उपाध्यक्ष मन्साराम कोळी, संघटक प्रकाश तायडे, सह सचिव उस्मान पठाण, शाखाध्यक्ष नारायण झटके, सुरेश टाक, संजय अडकमोल, दिनकर सूर्यवंशी, सुरेंदरसिंग ठाकुर, संजय रावलकर, निखील नरवाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रसंगी उपमुख्यअभियंता मोहन आव्हाड यांनी पदाधिकार्‍यांचा परीचय करून दिला.