रावेर । जळगाव जिल्हा परिषदेत भाजपाने केलेले विकास कामांच्या जोरावर पुन्हा स्पष्ट बहुमतांनी आमचीच सत्ता येणार शहरात मिळालेल्या यशानंतर आता ग्रामीण मतदार सुद्धा भाजपाला मतदान करून भाजपाचा अध्यक्ष बनविणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी सांगितले. येथील भाजपा तालुका कार्यालयाच्या उद्घाटनासाठी वाघ रावेरात आले होते. यावेळी त्यांनी तालुक्याच्या भाजपा उमेदवारांची भेटी घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार उपस्थित होते.
८ रोजी भाजपचे प्रचार नारळ
येथील ओकारेश्वर येथे बुधवार ८ रोजी तालुक्यातील भाजपा उमेदवारांचे प्रचार नारळ फुटणार आहे. या कार्यक्रमाला जलसंपदामंत्री गिरीश महाजन, भाजपा नेते एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे आदी पदाधिकारी उपस्थित
राहणार आहे.
लवकरच जाहिरनामा व स्टार प्रचारकांच्या सभा
पत्रकारांशी पुढे बोलतांना सांगितले की, लवकरच जळगावात जिल्हा परिषदेचा जाहिरनामा महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार असून प्रत्येक गटात दिग्गज नेत्यांच्या सभा घेण्यात येणार असून पहिलीच सभा जिल्ह्यातील म्हसावद येथून मुख्यमंत्र्यांच्या सभेने होणार आहे. यंदा निवडणुकीत ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांची पक्ष नक्की विचार करतो.
लाल दिव्यावर चुप्पी
तालुक्यात ओबीसी महिला आरक्षित जागेचे तीन गट असून जिल्हाध्यक्ष पद हे महिलांसाठी राखीव आहे. त्यामुळे या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या पत्रकारांनी लाल दिवा कुणाला मिळणार याबाबत उदय वाघ यांना विचारले असता त्यांनी प्रश्नाला बगल देऊन अध्यक्षपद हे भाजपा कोअर कमेटी ठरवत असल्याचे सांगितले. त्यामुळे लाल दिवा तालुक्याला मिळतो की, नाही हा प्रश्नच आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी त्यांच्या सोबत तालुक्याचे आमदार हरिभाऊ जावळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन जिल्हा परिषद आरोग्य सभापती सुरेश धनके, तालुकाध्यक्ष सुनील पाटील, भाजपा पक्षाचे सरचिटणीस वासुदेव नरवाडे, शिवाजीराव पाटील, विलास चौधरी, पंचायत समिती सदस्य महेश चौधरी आदी उपस्थित होते.