मुंबई । 69टक्के भारतीयांना 1000 रूपयांची नोट पुन्हा चलनात हवी असल्याचे वे2ऑनलाइन, या इंग्रजी व प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये बातम्या व माहिती साधकांच्या गरजांची पूर्तता करणार्या ‘मीडिया ऑन मोबाइल’ कंपनीने निश्चलनीकरणानंतर भारतीय चलनाच्या वापराबाबत केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. चलनाच्या देवाणघेवाणीचा दर निश्चित करण्यासाठी करण्यात आलेल्या सखोल बाजार सर्वेक्षणात 1000 रूपयांची नोट परत येणे आवश्यक असल्याचे अर्ध्याहून अधिक जनतेला वाटत आहे.
नोटबंदीनंतर रिजर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा चलनात आणल्या काही कालावधीतच 500 रुपयांच्या नोटा व्यवहारात आणल्या. परंतु 1000 रुपयांच्या नोटा चलनात आणण्यास मात्र रिजर्व्ह बँकेने संमती दर्शवली नाही. 500 व 2000 रुपयांच्या नोटांमध्ये खूपच अंतर असल्यामुळे सुट्ट्या पैशांची चणचण भासत असल्याचे लोकांनी सांगितले.
नवीन चलनी नोटेमुळे मोठ्या रकमेसाठी सुट्टे पैसे मिळण्याची समस्या सुटेल का याबाबत मते घेतली. सर्वेक्षण केलेल्या 62 टक्के लोकांना 500 आणि 2000 रूपयांच्या नोटांनी आधीच्या चलनी नोटांची जागा घेतल्यापासून सुट्टै पैसे मिळण्याबाबत समस्या आली आणि 38 टक्के लोकांना सुट्टे पैसे मिळण्यात अडचण आली नाही.
– राजू वनापाला, संस्थापक वे2ऑनलाइन