उद्योगाने समाजाला प्रेरणा देण्याचे काम आवश्यक

0

शहादा । गाडी-लोहार समाजातील अनेक लोकांच्या हाताने ही दर्जेदार कलात्मक वस्तु तयार होतात. प्रगतशिल कारागिर असलेला या समाजाला प्रेरणा देण्याचे काम उद्योग व्यवसायाने केल्यास खर्‍या अर्थाने विश्‍वकर्मा उद्योग मेळावा साजरा होईल, असे प्रतिपादन नंदुरबार जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे यांनी केले आहे. गाडी-लोहार समाज प्रबोधनी मंडळाच्यावतीने श्री विश्वकर्मा भगवान मुर्तीची प्राणप्रतिष्ठा तसेच त्याचे औचित्य साधत उद्योग महामेळाव्याचे आयोजन शांतीनगरमध्ये करण्यात आले. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे यांचे हस्ते झाले.

कलांना प्रोत्साहन देणारे साधन नसल्याने पिछेहाट

यावेळी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत सातारकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उपेंद्र सांगळे, न्यायाधिश चंद्रकांत लोहार, अखिल भारतीय विश्‍वकर्मा प्रबोधनिचे मुख्य समन्वयक प्राचार्य डॉ.अनिल लोहार, कार्यध्यक्ष युवराज जाधव, राजेंद्र जाधव, अखिल भारतीय प्रबोधनिचे युवा अध्यक्ष जितेंद्र जाधव, योगेश लोहार, राकेश लोहार, मुकेश लोहार उपस्थित होते.साताळकर यांनी म्हटले की, गाडी-लोहार समाजातील कलाकारांनी तयार केलेल्या कलात्मक वस्तुंना जिल्हा पुढे आणू, या करीता जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या वर्षात उद्योग मेळाव्याचे आयोजन करणार आहोत. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.अनिल लोहार यांनी केले आहे. संचलन विष्णू जोंधळे तर आभार रुपेश जाधव यांनी केले आहे. यावेळी महाराष्ट्र सह गुजरात, मध्यप्रदेश राज्यातून 25 उद्योजक मेळाव्यात उपस्थित होते. मेळावा यशस्वीतेसाठी प्रा.के.बी.लोहार, प्रा.पापालाल लोहार, जितेंद्र परमार, प्रदीप लोहार, ढोलम लोहार, विलास सांगोरे, सुनिल लोहार, सुनिल गोराणे, रविंद्र लोहार, रविंद्र सुर्यवंशी, भरत लोहार, योगेश लोहार, योगिराज जाधव, मोहन जाधव, माधव लोहार, हरिष लोहार, चंद्रकांत गोराणे यांच्यासह सदस्यांनी परिश्रम घेतले.