नवी दिल्ली । सात नंबरची जर्सी घालण्यामागचे गूढ रियल माद्रिदचा सुपरस्टार क्रिस्टीयानो रोनाल्डोने याने सार्वजनिक केले आहे. रोनाल्डो सांगतो मँचेस्टर युनायटेड कडून तो जेव्हा प्रथम खेळला तेव्हा त्याने 28 नंबरची जर्सी मागितली होती मात्र इंग्लंडचा महान फूटबॉलपटू सर अॅलेक्स फर्ग्युसन यांनी त्याला सात नंबरची जर्सी घालण्यास सांगितले कारण हा नंबर महान फुटबॉलपटूंच्या जर्सीचा नंबर आहे.
फर्ग्यसन स्वतः 7 नंबरची जर्सी घालत. इतिहास पाहिला तर असे दिसते की जॉर्ज बेस्ट, ब्रायन रॉबसन, एरिक कॅटोना, डेव्हीड बेकहम हे सारे 7 नंबरची जर्सी वापरत होते.सीआर 7 या नावाने रोनाल्डो प्रसिद्ध आहे. सध्या तो रियल माद्रिद कडून खेळतो व तो सध्याचा सर्वात उत्तम खेळाडू आहे. बेस्ट फुटबॉलरसाठीचा बॅलोन डी ओर खिताब त्याने चार वेळा जिंकला आहे.