जळगाव। प्रशासनात उल्लेखनीय कामगिरी करणार्या कर्मचार्यांना केंद्र शासनातर्फे कै.डॉ.एस.एस.गडकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असते. यावर्षी देण्यात येणार्या गडकरी पुरस्काराचे वितरण 7 जुलै रोजी करण्यात येत आहे. या पुरस्करासाठी महाराष्ट्रातुन एकमेव जळगाव जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे स्विय सहाय्यक असलेले निलेश पालवे यांची निवड झाली आहे.
मुंबईत या पुरस्काराचे वितरण होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांनी या पुरस्काराची घोषणा केली. 18 मे केली होती. इंडियन इन्स्टिटयूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्टे्रशनच्या वेबसाईटवर या पुरस्कार्थींचे नाव जाहीर करण्यात आले होते. पालवे यांनी प्रशासनामध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग करुन नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहे.