7 मार्च ला वीजग्राहक तक्रार निवारण

0

पुणे:- पुणे परिमंडलातील सर्व विभागीय कार्यालयांत बुधवारी (दि. 7 मार्च) महावितरणच्या वतीने वीजग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. वीजग्राहकांच्या प्रामुख्याने वीजबील, नवीन कनेक्शन आदींसह वीजसेवेशी संबंधीत तक्रारी त्वरित निकाली काढण्यात येणार आहेत.

रास्तापेठ, पद्मावती, नगररोड, पर्वती, बंडगार्डन, कोथरूड, पिंपरी, भोसरी, शिवाजीनगर तसेच मंचर, राजगुरुनगर आणि मुळशी या विभाग कार्यालयांत सकाळी 11 ते दुपारी एक वाजेदरम्यान कार्यकारी अभियंता हे वीजग्राहकांनी दाखल केलेल्या तक्रारींवर सुनावणी घेतील आणि त्या निवारणासाठी तात्काळ कार्यवाही करणार आहेत. वीजग्राहकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.