7 लाखांच्या गुटख्यासह दोन अटकेत

0

पिंपळनेर । पिंपळनेर पोलीस व अन्न भेसळ प्रतिबंधक अधिकारी यांच्या संयुक्त कारवाईने शुक्रवारी 22 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास नवापूर पिंपळनेर रस्त्यावर मानव केंद्राजवळील (मल्याचापाडा) जवळ मिनी महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीची आयसर येणार विमल पान मसाला गुटखा व सुगंधित तंबाखू असा 7 लाख 38 हजार 800 रुपयांचा माल हस्तगत दोन व्यक्ती ताब्यात घेतले असुन पोलिसांची कारवाई उशिरापर्यंत सुरू होती.

पोलीस व अन्न भेसळ विभागाची संयुक्त कारवाई
पिंपळनेरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील भाबड व उपनिरीक्षक योगेश खटकळ यांना गुप्त माहितीनुसार नवापूरकडून गुटखा घेऊन येणारे वाहन पिंपळनेरमार्गे जाणार असून याबाबत अन्न भेसळ विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी एस.बी.पवार, एम.के.गौरी, यांचे पथक उपस्थित होते. त्यावेळी नवापूरकडुन येणारी मिनी आयसर क्रमांक (एमएच 18 एफ 2075) हि गाडी मानव केंद्राजवळ थांबवली चौकशी साठी गाडी ताब्यात घेतल्यावर सदर गाडीतून विमल पान मसाला, सुगंधित तंबाखू व ईतर पान मसाले आढळून आलेत. जप्त केलेल्या मालाची मोजमाप सुरू असुन अंदाजे किंमत 7 लाख 38 हजार 800 रूपये असल्याची अन्न व भेसळ विभागाने सुरक्षा अधिकार्‍यांकडून माहिती मिळाली. यावेळी गाडी सोबत असणारे आरोपी सोयी युसुफ खान व आज बाजार स्मशान पठाण रा. नवापूर यांना ताब्यात घेतले त्याच्या विरोधात अन्न सुरक्षा व मानले कायदा 206 नियम व नियमन 2011 अंतगॅत कारवाई करण्यात आली.