7 व्या भारतीय छात्र संसदेमध्ये जळगावच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

0

जळगाव । पुणे येथे झालेल्या 7 व्या भारतीय छात्र संसदेत देशातील 8 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यासोबत निदरलँड देशातील अ‍ॅम्स्ट्राडॅम विद्यापीठाचे 100 विद्यार्थ्यांनी तसेच नेपाल येथील 137 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या तीन दिवसीय छात्र संसदेमध्ये खालील 6 विषयांवर चर्चा झाली व ठराव मंजूर करण्यात आले. जळगाव येथील 367 विद्यार्थ्यांनी 7 व्या भारतीय छात्र संसदमध्ये सहभाग नोंदविला. भारतीय छात्र संसद विद्यार्थी परिषदचे महाराष्ट्र राज्याचे समन्वयक विराज कावडीया यांना विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मंचावर आपले मत मांडण्याची संधी देण्यात आली.

विचारांचे आदान-प्रदान
सामाजिक कार्याबद्दल त्यांचे आभार व सत्कार भारतीय छात्र संसदचे संयोजक राहूल कराड यांनी केले. सुशिक्षित युवकांनी समाज सुधारासाठी राजकारणात येऊन ठोस विधायक कार्य प्रामाणिकपणे करण्यासाठी प्रेरीत करणे हे या भारतीय छात्र संसदचा मुख्य उद्देश आहे. विविध राज्यातील विद्यार्थ्यांचा मेळावा असून विचारांचे आदान-प्रदान या मंचाद्वारे यशस्वीपणे होत असते. विविध समस्यांवर चर्चा होऊन ठरावाच्या रुपात तोडगा काढण्यात येतो. भारत सरकार व महाराष्ट्र शासन तसेच युनेस्को चे सहकार्य प्राप्त होते.