Thieves Stole Plates Worth 70,000 From Some Shiwar भुसावळ : तालुक्यातील किन्ही शिवारातील एमआयडीसी प्लॉट नंबर एच.96 येथभल कंपनीच्या आवारातून अज्ञात चोरट्याने सुमारे 70 हजार रुपये किंमतीच्या स्लॅबच्या प्लेट लांबवल्या. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञातांनी लांबवल्या प्लेटा
किन्ही शिवारात कंपनीच्या आवारात ठेवलेल्या स्लॅबच्या प्लेट सोमवार, 22 रोजी संध्याकाळी सहा ते 23 ऑगस्टच्या सकाळी आठ दरम्यान कोणी तरी चोरट्यांनी प्लेट चोरून नेल्यात. याप्रकरणी गौरव अनिल तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ुढील तपास संदीप बडगे करीत आहेत.