जळगाव : तालुक्यातील नशिराबाद येथील 70 वर्षीय वृध्दाला अज्ञात वाहनाने चिरडल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विश्वनाथ लक्ष्मण राणे (70, रा.नशिराबाद) असे मयताचे नाव आहे
अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू
विश्वनाथ राणे हे वॉचमनचे काम करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाळ करीत होते. मंगळवार, 3 मे रोजी रात्री 10 वाजता कामावरून घरी पायी येत असताना राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबाद गावाच्या पुढे अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता त्यांना मयत घोषीत करण्यात आले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.