नंदुरबार । तालुक्यातील वाघोदा येथे दोन गटात तुफान दंगल उसळल्याची घटना घडली. यादंगलीत 4 जण जखमी झाले आहेत. पोलीस ठाण्यात याबाबत 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघोडा ग्रामपंचायतीचे शिपाई संजय पाडवी यांच्याकडून नारायण हरदास यांच्या घराच्या उतार्याची मागणी करण्यात आली होती. ती पूर्ण झाली नाही, याचा राग येऊन 11 जणांनी संजय पाडवी यास लोखंडी सळई ने व काठ्यांनी जबर मारहाण करण्यात आली. यावेळी भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या अन्य चार जणांना देखील जखमी करण्यात आले. याबाबत संजय पाडवी यांनी पोलीसात फीर्याद दिली असून 11 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे,