जळगाव समांतर रस्ते कृती समितीने घेतली महापौरांची भेट!

0

जळगाव । शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गालगतच्या समांतर रस्त्यांसाठी जळगाव समांतर रस्ते कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. समांतर रस्त्यांसाठी या समितीने पुढाकार घेतला असून समांतर रस्ते पूर्ण होऊन त्यांचा वापर सुरु होईपर्यत समिती विषयाचा महापालिका, केंद्रसरकार व राज्यसरकार या स्तरावर पाठपुरावा करणार आहे. समिती विविध प्रकारची कार्यवाही करणार असुन त्याचे टप्पे निश्‍चित करण्यात आले आहे. त्यापैकी एक म्हणजे महानगर पालिका महापौर आणि आयुक्त यांची बैठक घेऊन चर्चा करणे. समितीने महापौर आणि आयुक्तांची भेट घेऊन समांतर रस्त्याविषयी चर्चा केली.

मनपा पुढाकाराला असमर्थ : समांतर रस्त्यांच्या मागणीसाठी मनपा स्वत: पुढाकार घेऊ शकत नाही कारण मनपाला राष्ट्रीय महामार्गाच्या ताब्यातील जागेत काहीही करण्याचा अधिकार नाही. अशी स्पष्ट भूमिका महापौर नितीन लढ्ढा यांनी कृती समितीच्या सदस्यांसमोर मांडली. यावेळी उपमहापौर ललित कोल्हे अभियंता सुनील भोळे यांच्यासह बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

यांची होती उपस्थिती

शहरातील 70 पेक्षा अधिक सामाजिक संस्था, संघटना समांतर रस्त्यांच्या मागणीसाठी एकत्र आल्या आहे. शासन, प्रशासन यांंच्यात समन्वय घडवून आणणे व त्यासाठी विधायक स्वरुपात जनमत तयार करणे हे समितीचे कार्य असणार आहे.
नगरसेवक अनंत जोशी, गजानन मालपुरे, विनोद देशमुख, दिलीप तिवारी, मंगला बारी, विराज कावडीया, अमित जगताप, सरिता माळी, डॉ.राधेश्याम चौधरी, फारुख शेख, कैलास सोनवणे, पियुष पाटील, भुषण सोनवणे, सचिन नारळे, मोवीकोराज कोल्हे, तेजस्विनी महाजन आदी उपस्थित होते.