जळगाव। बोदवड येथील जिल्हा बँकेच्या शाखेतील खातेदारांच्या कागदपत्राची हेरफेर करून तब्बल 72 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी बँकेच्या महिला कर्मचारी अपेक्षा विवेक पांडे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पांडे यांचा अंतरिम जामिन रद्द झाल्याने त्यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी बुधवारी 3 मे रोजी बोदवड शहरातून अटक केली. त्यांना न्यायलयात हजर केले असता 5 मे पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
न्यायालयाकडून 5 मे पर्यंत पोलिस कोठडी
शहरातील जिल्हा बॅकेच्या शाखेत ठेवीदारांच्या ठेवी, शासनाच्या श्रावण बाळ, संजय गांधी योजनेतील लाभार्थी यांच्या खात्यातील रक्कम सुमारे 72 लाख रुपये बनावट कागदपत्रे, स्वाक्षरीच्या आधारे बँक कर्मचारी अपेक्षा विवेक पांडे यांनी काढले होते. सदर बाब बँक अधिकारी याच्या लक्षात आल्यानंतर मधुकर केळकर याच्या फिर्यादीवरून बोदवड पोलिसात गुन्ह्याची नोंद झाला होता. अटकपूर्व जामीनासाठी त्यांनी जिल्हा न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला होता परंतु न्यायालयाने त्यांच्या जामीन नाकारण्यापासून त्या फरारच होत्या. याप्रकरणी अपेक्षा पांडे यांनी सर्वोच्च न्यायालयातून अंतरिम जामिन मिळविला होता. या जामिनाच्या विरोधात जळगाव येथील आर्थिक गुन्हे शाखा ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पांडे यांचा अंतरिम जामिन रद्द झाल्याने 3 मे 2017 रोजी सकाळी 11.45 वाजता आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ए.के.रत्नपारखी, कर्मचारी जीवन पाटील, मसूद शेख, प्रवीण जगताप, महिला पोलीस चव्हाण, सोनवणे यांनी आरोपी महिला अपेक्षा पांडे यांना त्यांच्या राहत्या घरून ताब्यात घेतले. आरोपी अपेक्षा पांडे यांना भुसावळ न्यायलयात हजर केले असता न्यायालयाने 5 मे पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.