निंभोरा । येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये स्नेहसंमेलन घेण्यात आले. यामध्ये नर्सरी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी कलागुण सादर केले.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात येवून उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक प्रल्हाद बोंडे यांनी केले. यावेळी गटविकास अधिकारी एम.एन. धिमते, प्राध्यापक महाजन, अॅड. संदिप भंगाळे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी शाळेचे सरचिटणीस चंद्रकांत खाचणे होते.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
यावेळी प्रमुख अतिथी सुरेखा येवले, किशोर चौधरी, दिलीप खाचणे, दत्तात्रय पवार, सुरेश चौधरी, रविंद्र नेहेते, विजय सोनार, प्रभाकर सोनवणे, मुख्याध्यापक वारके, पी.के. चौधरी, संदिप कोळी, दस्तगीर खाटीक, दिलीप सोनवणे, गुलाब पिंजारी उपस्थित होते. सुत्रसंचालन दिलशाद यांनी केले. यशस्वीतेसाठी दिपक सोनवणे, चैतन्य कोंडे, जयश्री जावळे, जयश्री बोरनारे, रितेश पाटील, जयश्री बारी, आशा इंगळे, प्रिती भंगाळे, वसंत पवार यांनी परिश्रम घेतले.