75 प्रकरणे निकालात

0

राजगुरुनगर :- राजगुरुनगर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात आयोजित लोकन्यायालयात 75 प्रकरणे निकालात काढण्यात आली असून बँकरिकव्हरी,लाईटबिल,दूरध्वनी आणि ग्रामपंचायत घरपट्टी अशी 29 लाख 21 हजार 927रुपये रक्कम वसुल झाली आहे. खेड तालुका विधी सेवा समिती,खेड न्यायालय व राजगुरुनगर बार असोसिएशन यांचा वतीने शनिवारी (दि.10) राजगुरूनगर न्यायालयात लोक न्यायालयाचे आयोजित लोकन्यायालयाचे उद्घाटन सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले.

यावेळी सहजिल्हा सत्र न्यायाधीश अतुल सलगर दिवाणी न्यायाधीश दाभाडे, पी. ए. साबळे, दिवाणी व फौजदारी न्यायाधीश व्ही. जे. कोरे, वाय. जे. तांबोळी, पी. डी. देवरे, एच. डी. देशींगे, सरकारी वकील गिरीश कोबल, रजनी नाईक, सायली ठोकळ, मोनिका निकम, खेड बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. अनिल राक्षे, उपाध्यक्ष संदीप घुले, अश्‍विनी मडके, संजय गोपाळे, महेंद्र सातकर, अ‍ॅड. बी. एम. सांडभोर, अरुण मुळूक, गणेश होनराव, गोरक्ष शिंदे, सी. एस. सांडभोर, बी. एम. सांडभोर, सुलभा कोटबागी, बाळासहेब लिंभोरे, किरण झिंजुरके, विधी सेवा समितीच्या सहाय्यक अधीक्षक एस. एस. बेलसरे, एस. जी. जोशी, महादेव कनकुरे यांच्यासह वकील, पक्षकार उपस्थित होते.