750 कोटी रुपये खर्चाच्या गुजरात-अंबुजा प्रकल्पाची होणार उभारणी

0

चाळीसगाव । औद्योगिक वसाहतीतील जलशुद्धीकरण प्रकल्प व 750 कोटी रुपय निधींचा गुजरात-अंबुजा प्रकल्प चाळीसगाव शहरात उभारला जाणार आहे. याकामकाजाचे व इतर विकास कामांचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी गुरुवारी 8 रोजी तालुक्यातील विविध विकास कामांची पाहणी केली. विकास कामांची सद्यस्थितीबाबत जिल्हाधिकारींनी माहिती जाणुन घेतली व तात्काळ कामकाज पुर्ण करण्याच्या सुचना दिलया. लोकप्रतिनिधी व नगराध्यक्ष यांच्या उपस्थितीत विश्राम गृहात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार उन्मेश पाटील, प्रांताधिकारी शरद पवार, तहसिलदार कैलास देवरे, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, जिल्हा परिषद सभापती पोपट भोळे, पंचायत समिती उपसभापती संजय पाटील, राजू चौधरी, के.बी.साळुंखे, दिनेश बोरसे, विश्वास चव्हाण आदींसह लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती.

या कामकाजाचा आढावा
तालुक्यातील जलयुक्त कामांची सध्य स्थिती, डोंगरी व तितुर नदीच्या पुर्नजीवन अभियान कामाचा आराखडा, नाट्यगृह, शिवस्मारक, उप जिल्हा न्यायालय औद्योगिक वसाहतीतील उद्योगांची माहिती, उत्तमराव पाटील वनउद्यान, के.की.मूस. कला दालण, शासकीय दूध योजनेच्या जागेवर प्रस्तावित प्रांताधिकारी कार्यालय यासह विविध विकास कामांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

क्रमांक एकची नगरपालिका
जिल्हाधिकारी यांनी नगारपरिषद कार्यालयाला भेट दिली. नगराध्यक्षायांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. पालिकेवे कामकाज, कर वसुलीची माहिती जिल्हाधिकार्यांनी यावेळी जिल्हाधिकारी दिली. भौगोलिक व आर्थिक अंदाज पत्राकानुसार क्रमांक एकची नगर परिषद आहे. प्रलंबित व प्रस्तावित कामे लवकरच मार्गी लावले जातील असे आश्वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिले.

उनोद्यांनाच्या कामाला गती
सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकार्‍याकडून जिल्हाधिकारी यांनी कामकाजाची माहिती जाणून घेतली. शहरातील वनोद्यानाच्या कामाला गती मिळणार आहे. विस्तारीकरण कामाची माहिती त्यांनी घेतली. शासकीय दूध संघाच्या जागेची नियोजित प्रशासकीय इमारतीच्या जागेची पाहणी केली. मीनाक्षी निकम यांच्या स्वयदीप परिवाराच्या हनुमानवाडी येथील कार्यालयाला देखील त्यांनी भेट देत पाहणी केली.