व्यक्तिमत्वही सुंदर असणे गरजेचे

0

मुक्ताईनगर । व्यक्तिमत्व विकासासाठी उच्च ध्येय ठेवणे आवश्यक आहे, असे सांगितले. तसेच व्यक्तिचे केवळ बाह्य व्यक्तिमत्व सुंदर असून भागत नाही तर त्याचे अंतर्गत व्यक्तिमत्वही सुंदर असले पाहिजे तेव्हाच व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास होईल, असे प्रतिपादन उमवि विद्यार्थी कल्याण विभागचेे प्रभारी संचालक प्रा.डॉ. उस्मानी यांनी केले.

संस्कृत वचनातून स्त्रीची महती

जी.जी. खडसे महाविद्यालयात उमवि जळगाव व महाविद्यालयातील विद्यार्थी कल्याण विभागाच्या युवती सभेंतर्गत एकदिवसीय विद्यार्थीनी व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून आपले मनोगत व्यक्त करतांना उमवि जळगावचे विद्यार्थी कल्याण विभागचेे प्रभारी संचालक प्रा.डॉ. उस्मानी यांनी ‘व्यक्तिमत्व विकासाचे युवतींच्या जीवनातील महत्व व उपयोगिता’ या विषयावर विविध उदाहरणांदाखल विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.आर. पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून ‘स्त्री जन्मा तुझी कहाणी’ या विषयावर मार्गदर्शन करतांना ‘न मातृ परदैवतम्ः’ या संस्कृत वचनातून स्त्रीची महती विषद करतांना आजच्या युवतींनी केवळ स्वतःच्या व्यक्तिमत्वासाठी देखील बांधील राहिले पाहिजे, असे मत
प्रकटीकरण केेले.

स्वसंरक्षण व स्पर्धा परीक्षेवर मार्गदर्शन

कार्यक्रमाच्या दुसर्‍या सत्रात मुक्ताईनगर डीवायएसपी समीर शेख यांनी ‘स्वसंरक्षण व स्पर्धा परीक्षा’ या विषयावर विविध दाखल्यांच्या माध्यमातून विस्तृत मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाच्या समारोप सत्रातील प्रमुख वक्ते जळगाव येथील बेंडाळे महाविद्यालयाचे प्रा. सत्यजित साळवे यांनी आपल्या व्याख्यानातून ‘मुलगी वाचवा मुलगी शिकवा’ या विषयावर उपस्थित विद्यार्थीनींना स्त्रीभृण हत्या रोखण्याचे व त्यांना सुशिक्षित बनविण्याचे आवाहन केले.

78 विद्यार्थीनींनी नोंदविला सहभाग

सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. इस्माईल हुसेन, युवती सभा समन्वयक प्रा. एस.ए. देशमुख, युवती सभा समितीतील सर्व सदस्य यांनी केले. सदर कार्यक्रमात कानपूर येथील प्रा. विरेंद्र शुक्ल यांची उपस्थिती लाभली तर शिबिरात विविध महाविद्यालयातील 78 विद्यार्थीनींनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. पी.पी. चौधरी यांनी केले तर आभार प्रा. सी.डी. खर्चे यांनी मानले.