मुंबई: तुटपूंज्या शिक्षणाअभावी तुम्ही जर सरकारी नोकरीपासून वंचीत राहिला असाल. तर, नाराज व्हायची काहीच गरज नाही. पोस्टामध्ये नोकरी तुमची वाट पाहात आहे. महाराष्ट्र पोस्टात तुमच्यासाठी संधी असून, त्यासाठी आठवी पास इतके नाममात्र शिक्षण असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये कुशल कारागीर पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. प्राप्त माहितीनुसार हे अर्ज 6 जगांसाठी मागविण्यात येत आहेत.
पात्रता: कुशल कारागीर पदासाठी अर्ज करू इच्छिणार्या उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण तसेच, 30 वर्षे आणि त्यापेक्षा कमी असणे आवष्यक आहे. यासोबतच उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त शैक्षक्षणीक संस्थेतून 8 उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची अंतीम तारीख
कुशल कारागीर पदासाठी उमेदवार 28 ऑगस्ट 2017 पर्यंत अर्ज करू शकतात.