८ धावात ८ विकेट, क्रिकेटचा ७१ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

0

बंगरूळू: भारतीय संघाने सामन्यात ट्वेंटी-ट्वेंटी मालिकेच्या विजयासह एक पराक्रम देखील केला. या सामन्यामध्ये भारताने इंग्लंडचे 8 धावांमध्ये शेवटचे 8 बळी घेतले. 119 धावसंख्या असताना इंग्लंडचे तिसरा गडी बाद झाला. त्यानंतर 127 धावांवर त्यांचा शेवटचा फलंदाज बाद झाला. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने 1946 साली कसोटी सामन्यामध्ये न्यूझीलंडचे 5 धावांमध्ये 8 गडी बाद केले होते. त्या विक्रमाच्या जवळ जाणारा हा विक्रम भारताकडून टी-20 सामन्यात नोंदविला गेला.

संपूर्ण संघ गारद
इंग्लंडच्या डावाची सुरूवात झाली होती. जेसन रॉय (३२), जो रुट (४२) आणि कर्णधार मॉर्गन (४०) यांनी चांगली फटकेबाजी केली होती. इंग्लंडच्या ११९ धावांवर दोन विकेट्स पडल्या होत्या. पण मॉर्गन आऊट झाल्यानंतर पुढच्या अवघ्या ८ धावांमध्ये इंग्लंडचा संपूर्ण संघ गारद झाला. क्रिकेटच्या इतिहासात केवळ दुसऱयांदाच असा पराक्रम केला गेला. याआधी तब्बल ७१ वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यात असा प्रसंग घडला होता. ऑस्ट्रेलियाने केवळ ५ धावांमध्ये न्यूझीलंडच्या ८ फलंदाजांना बाद केले होते. त्यानंतर काल इंग्लंडने भारताविरुद्धच्या सामन्यात ८ धावांत ८ विकेट्स गमावल्या.

चहलची अनोखी पहल
युझवेंद्र चहलने सहा विकेट्स घेऊन केलेल्या अप्रतिम कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. चहलच्या फिरकीपुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. इंग्लंडचा डाव १२७ धावांत गुंडाळून भारताने ७५ धावांनी विजय मिळवला. भारताने ही टी-२० मालिका जिंकली आणि इंग्लंडला तीनही फॉर्मटमध्ये व्हाइटवॉश दिला. क्रिकेटच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा 8 विकेट अशा पद्धतीने घेण्यात आल्या. इंग्लंडने केवळ 8 धावांमध्ये 8 फलंदाज गमावले.