8 नक्षल्यांचा खात्मा

0

हैदराबाद : नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत तेलंगणा राज्याच्या विशेष पोलिस दलाला मोठे यश मिळाले आहे. 8 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात विशेष दलाला यश आले. गुरूवारी सकाळी तेलंगणातील टेकुलापल्लीच्या जंगलात भेटापुडी गावाजवळ झालेल्या चकमकीत या नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. चकमक झालेल्या ठिकाणाहून विशेष दलाने मोठ्या प्रमाणात शस्त्रसामग्रीदेखील हस्तगत केली आहे. याशिवाय, दैनंदिन वापरल्या जाणार्‍या अनेक वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत. नक्षलवाद्यांच्या संशयित हालचालीची कुणकुण पोलिसांना मिळाली होती अशी माहिती आहे. सध्या याठिकाणी सुरक्षारक्षकांनी शोधमोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेतली होती.