जळगाव । जिल्ह्यातील चोपडा येथील पंकज महाविद्यालयात मानसशास्त्र विषयासाठी प्राध्यापक म्हणून निवड झाल्यानंतर किरकोळ कारणावरुन सेवेपासून वंचीत झाल्याप्रकरणी संबंधीत प्राध्यापकाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणीअंती संस्थेने प्राध्यापकास पुन्हा सेवेत रुजू करण्याचे आदेश दिले आहे. येथील प्रा.डॉ.आशिष जाधव यांची 2009 मध्ये पंकज महाविद्यालयात प्राध्यापक पदावर निवड झाली होती तत्कालीन कुलगुरु के.बी.पाटील यांनी ना-हरकतची त्रुटी दाखवित जाधव यांना सेवेत सामावून घेतले नव्हते या संदर्भात जाधव यांनी पंकज एज्युकेशन ट्रस्ट, प्राचार्य पंकज महाविद्यालय, उमवि व शिक्षण विभाग सहसंचालक यांचेविरुध्द धाव घेतली होती. आशिष जाधव यांच्यावतीने अॅड. एस.आर.बारलिंगे व अॅड. कल्याण पाटील यांनी काम पाहीले. अंतीम सुनावणी न्या. एस.पी.हयात नगरकर यांनी निवाडा दिला.