भुसावळ। वीज निर्मितीच्यासाठी दिपनगर येथील शेतकर्यांनी 1962 पासून तब्बल आजवर आठ वेळा आपली जमिन देवून देशाच्या विकासासाठी आपला सहभाग दिला परंतू महाजनकोने वारंवार शेतकर्यांचा विश्वासघात केला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना अजुनही न्याय मिळाला नाही. त्यांना दिपनगर केंद्रात प्रशिक्षणार्थी म्हणून सामावून घेण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी दिपनगर मुख्य अभियंता माधव कोठुडे यांच्याशी चर्चा करतांना मागणी केली.
आश्वासन विरले हवेतच
प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि महाजनकोच्या त्रिसदस्यीय समितीत झालेल्या करारानुसार महाजनकोने प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या मुलांना तांत्रिक शिक्षणासाठी मदत करुन त्यांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन हवेतच विरले आहे. याबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही आजवर प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना लाभापासून वंचित ठेवलेले आहे.
केंद्रातून निघणारी राख ठरतेय डोकेदुखी
विज निर्मितीमुळे होणारे प्रदुषण व त्या प्रदुषणामूळे होणारे दुष्परिणाम येथील स्थानिक नागरिक व शेतकरी यांनाच सोसावे लागत आहे. वीज निर्मितीनंतर या प्रकल्पातून दररोज साधारण 20 हजार 500 मेट्रिक टन राख निघणार आहे. आधीच राखेने तुंडूब भरलेल्या वेल्हाळा बंडात ही राख सोडण्यात येत आहे, त्यामुळे विस्तारित प्रकल्पातून निघणारी राख डोकेदुखी ठरली आहे असे शिवसेना तालुका प्रमुख समाधान महाजन यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवा सोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, तालुका प्रमुख समाधान महाजन, विलासजी मुळे, प्रा.धिरज पाटील, शिक्षक सेनेचे विनोद गायकवाड, वाहतुक सेनेचे रफीक खान, अजय पाटील, देवेंद्र पाटील, विकास पाटील, नितिन मराठे, विकास पाटिल, अजय पाटिल, शुभम सोनार, विजय तायडे, अबरार खान, सुरेन्द्र सोनवने, निलेश ठाकुर,निखिल सुरवाड़े, नितिन सोनवने, संभाजी पाटिल, राजेंद्र तायडे, हेमंत तायडे, सीताराम तायडे, रमेश (भूरा) धरने तसेच शिवसेना व युवासेना, शिव वाहतूक सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.