नंदुरबार: शहरात एका 80 वर्षाच्या आजीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान या आजीवर खासगी उपचार सुरू असलेला दवाखाना सील करण्यात आला आहे. शहरात अहिल्यादेवी चौक भागात राहणाऱ्या आणि तुलसी हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेल्या 80 वर्षाच्या महिला रुग्णाचा कोविड 19 चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रुग्णाची प्रकृती गंभीर असून व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे.