80 फुटी रोडवर 2 गटात हाणामारी

0

साक्री। शहरातील 80 फुटी रोडवर तिरंगा चौकात परवा 18 मे रोजी रात्री 11 वाजेच्या समुरास किरकोळ कारणावरुन दोन गटात जोरदार हाणामारी झाली. त्यात लाठ्या-काठ्यांचा वापर व दगडफेक करण्यात आली. त्यामुळे परिसरात चांगलाच तणाव पसरला. हाणामारीत काही लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत आझादनगर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी देण्यात आल्या आहेत.

9 जणांना केले आरोपी
फिर्यादी खालीद अहमद शाह (19) रा. तिरंगा चौक याने ह्या प्रकरणी 9 जणांना आरोपी केले आहे. त्यात इजाज सादीक शाह, शाहरुख ईस्माईल शाह, इम्रान हमीद अन्सारी, आसिफ मुल्ला, भोलू शाह, शाबीर शाह, रमजान शाह, नईम अन्सारी व हमीद यांचा समावेश आहे. तर दुसरी फिर्याद शाहरुख ईस्माईल शाह (19) रा. 80 फुटी रोड याने दिली आहे. त्यात खालीद अहमद शाह, निहाल अहमद अ. रहेमान अन्सारी, कलीम शेख आबीद शेख, शेख पेंटर, शहीर शेख पेंटर, जुबेर शेख नसरुद्दीन शेख उर्फ पेंटर, अबुलाल रोशन हाजी, डॉन रिक्षावाला आदींचा समावेश आहे. दोन्हीही प्रकरणी तपास पीएसआय नागलोत करीत आहेत.