80 वर्षीय वृद्धाने केला बालिकेचा विनयभंग

0
कंडारीतील संतापजनक घटना ; आरोपीला अटक
भुसावळ- बालिका अत्याचार प्रकरणांनी देश ढवळून निघाला असतानाच तालुक्यातील कंडारी येथे दलित समाजाच्या नऊ वर्षीय बालिकेशी अंगलट करण्याची संतापजनक घटना सोमवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर शहर पोलिसांनी आरोपीस तत्काळ अटक केली. संशयीत आरोपी हाफिज खान (बाबा, वय 80, रा.सम्राट अशोक नगर, मस्जीदजवळ, कंडारी प्लॉट, कंडारी)  असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीचे कंडारीत  कटलरीचे दुकान असून पीडीत नऊ वर्षीय बालिका दोरा घेण्यासाठी सोमवारी दुपारी 12.30 दुकानात गेली असता संशयीत आरोपीने विनयभंग करीत अंगलट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पीडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीविरुद्ध विनयभंग, अ‍ॅट्रासिटी, पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसपी नीलोत्पल करीत आहेत.