जळगाव । शासनाने पंतप्रधान पीक विमा योजनेला मुदतवाढ दिल्याने 4 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात एकुण 80 हजार 361 शेतकर्यांनी पीक विम्याचा हप्ता भरला आहे. यातील 78 हजार 351 शेतकरी कर्जदार तर काही शेतकरी विना कर्जदार आहेत. ऑनलाइन यंत्रणेमध्ये अडचणी येत असल्याने रात्री उशिरापर्यंत विम्याचा हप्ता स्विकारला जात होता. बँकांकडे 15 कोटी 78 लाख रुपयांचा प्रिमीअम भरला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेची 31 जुलैपर्यंतची मुदत संपली होती.
सर्वाधिक जिल्हा बँकेत पिक विमा
ऑनलाइन अर्जासाठी तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे शासनाने विमा हप्ता आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती. ही मुदतवाढ शुक्रवारी संपली. राष्ट्रीयकृत बॅका, खाजगी बॅका आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेवर विम्याच्या कामांची प्राधान्याने जबाबदारी दिली होती. ऑगस्टपर्यंत सर्व बँकांकडे एकुण 80 हजार 361 शेतकर्यांनी विम्याचे अर्ज भरले आहेत. ऑगस्ट रोजी रात्री उशिरापर्यंत अर्ज भरून घेण्याचे आदेश दिले होते. शेवटच्या दिवशी आणखी ते हजार शेतकर्यांनी अर्ज भरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या प्रक्रियेमुळे जिल्हा प्रशासनाने शनिवारपर्यंत आकडेवारी सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तर सर्वाधिक 62 हजार 576 शेतकर्यांनी जिल्हा बँकेच्या 248 शाखांमध्ये पीक विमा काढला आहे.