नुकतेच युनायटेड स्टेटमधील विस्कोंसिन या संस्थेकडून खोदकाम करण्यात आले, त्यावेळी त्यांना एक हंडा मिळाला, ज्यामध्ये सापडलेल्या वस्तूंना पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसला. मानव इतिहासातील गुढ रहस्यांना जाणून घेण्यासाठी पुरातत्व विभाग नेहमीच खोदकाम करत असते. खोदकाम करतांना मिळणार्या वस्तू आणि त्यांचे अवशेष यांचे पुरातन काळातील महत्त्व काही औरच असते. त्यामुळे पुरातन काळातील संदर्भही या वस्तूंच्या साहाय्याने मिळवणे शक्य होत असते. नुकतेच युनायटेड स्टेटसच्या विस्कोसिन या संस्थेने खोदकाम केल्यानंतर त्यावेळी हंडा सापडला. तो किमान 800 वर्षे जुना होता. त्यात सोने-चांदीचे शिक्के नव्हे, तर विचित्र बीयाणे होती. त्यातील काही बियाणे खराब झाली होती, तर काही बियाणे चांगली होती. त्यांच्या पिकाचा शोध घेण्यासाठी त्यातील एक बी पेरण्यात आले, तेव्हा त्यातून जे फळ आले, त्यावरून कळले की, तो भोपळ्याचा प्रकार आहे. 800 वर्षे आधी मानवाने दूरदृष्टी ठेवून बियाणे शोधली, ज्याचा आजही मानवाला फायदा होत आहे.