82 वर्षीय माजी उपपंतप्रधान तुरुंगातून झाले अखेर ‘12वी पास’

0

चंदिगड । सध्या कारागृहात तुरुंगाची हवा खात असलेले भारतीय राष्ट्रीय लोक दलाचे सर्वेसर्वा तथा हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला हे अखेर वयाच्या 82 व्या वर्षी 12 वीची परीक्षा उतीर्ण झाले आहेत.

शिक्षक भरतीच्या घोटाळ्याप्रकरणात चौटाला तरुंगवासी आहेत. ते मुख्यमंत्री असताना शिक्षक भरतीचा घोटाळा समोर आला होता. मात्र, तुरुंगात असूनही त्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही. माझी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीच्या तिहार कारागृहातून मागील महिन्यात 12 वीची परीक्षा दिली होती. ’नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ओपन स्कुलिंग’द्वारा घेण्यात आलेल्या या परीक्षेत चौटाला ’टॉप’ आले आहेत.

याबाबची माहिती चौटाला यांचे पुत्र आमदार अभय चौटाल यांनी दिली. जेव्हा माझे वडील शाळेत होते. तेव्हा माझे आजोबा माजी उप पंतप्रधान देवीलाल हे शेतकर्‍यांच्या अधिकारांसाठी कारागृहात होते. त्यामुळे माझे वडील घरात मोठे असल्यामुळे घराची जबाबदारी माझ्या वडिलावर आली आणि याच कारणामुळे त्यांना शाळा सोडावी लागली. गेल्या महिन्यात हिसारचे खासदार, चौटाल्यांचा नातू दुष्यांत चौटाला यांचा विवाह होता. त्या दरम्यान चौटाला पॅरोलवर तुरुंगाबाहेर होते. मात्र, परीक्षेची तारीख 23 एप्रिल असल्यामुळे त्यांनी पुन्हा तुरुंगात जाणे पसंद केले, असे अभय यांनी सांगितले.