जळगाव । खान्देशात सर्वप्रथम व्यवस्थापन शास्त्र अभ्यासक्रमाचे शिक्षण देणारी संस्था अशी ओळख असलेल्या के.सी.ई सोसायटीच्या इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेटं अॅण्ड रिसर्च च्या सिनर्जी 2017 ह्या वार्षिक महोत्सवाला 14 फेब्रुवारी 2017 पासून सुरूवात झाली. आजच्या तिस-या दिवसात विदयार्थ्यांमधील उत्साह शिगेला पोहचला त्याचे निमित्त होते फॅशन शो आपल्या विविध कलागुणांच्या सादरीकरणासाठी वर्षभर वाट पाहणार्या विदयार्थ्यींनी कलाकारांसाठी दिवाळीचा सण असलेला हा वार्षिक महोत्सव 14 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
या चार दिवसात विदयार्थी विविध कलागुणांचे सादरीकरण करणार असून शेवटच्या दिवशी त्या कलागुणांचा बक्षिण देवून सन्मानित करण्यात येणार आहे. आज सिनर्जीच्या तिसर्या दिवशी बेस्ट ऑउट ऑसेटवेट, मोबाईल शॉट फिल्म अॅण्ड डॉक्युमेटरी, वादविवाद, शिक्षकांची अंताक्षरी आणि सर्वात महत्वाचा म्हणजे फेशन शो यात विदयार्थ्यांनी धमाल केली. टाकावू वस्तूंपासून कलात्मक पद्धतीने वापर करून अतिषय सुबक वस्तू तयार करता येतात याचे उत्तम सादरीकरण विदयार्थ्यांनी बेस्ट ऑउट ऑफ वेस्टच्या माध्यमातून केले. एकप्रकारे आयएमआरच्या वार्षिक स्नेहसंमेलनातून आगळावेगळा दृष्टिकोन विकसित करण्याची संधी विदयार्थ्यांना उपलब्ध झाले आहे. मोबाईल शार्ट फिल्मद्वारे विदयार्थ्यांमधून दडलेल्या कॅमेरामन आणि कथाकाराला एक उत्कृष्ट व्यासपीठ मिळवून दिले. गुरूवारी सादर झाालेल्या विविध कलाप्रकारांसाठी परिक्षक म्हणून बेस्ट आउट ऑफ वेस्टसाठी स्वाती लाठी, काजल फिरके, मोबाईल शॉट फिल्मसाठी अॅड. पद्मनाभ देशपांडे, अमरसिंग राजपूत, डॉ शिल्पा बेंडाळे, वादविवादसाठी गिरीश कुलकर्णी, भाव्या मार्थी तर फॅशन शोसाठी आशिष खत्री, खलिक शेख, काजल सुखवाणी, हिरा चौधरी, संकेत नेवे यांनी जबाबदारी पार पाडली
गुरूवारी सादर झालेल्या कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी संचालक डॉ. विवेक काटदरे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सिनर्जी समन्वयिका डॉ शमा सराफ हयांच्यासोबत प्रा. योगेश पाटील, प्रा. चंद्रशेखर वाणी प्रा राजीव प्रा नितीन खर्चे, प्रा. भूषण पाचपोळे प्रा. अमोल पांडे, प्रा संदीप घोडके, प्रा एसएन खान, प्रा वर्षा पाठक, प्रा स्वप्नील महाजन, प्रा. खुशबु बांगर, ह्या विदयार्थ्यांनी कामकाज पाहिले.