चाळीसगाव। भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे शुक्रवारी 9 रोजी पोलीस प्रशासनाने मद्य विक्रीच्या ठिकाणी छापा टाकला असता 84 हजार 280 रुपये किंमतीचे मद्य जप्त करण्यात आले आहे. यात देशी, विदेशी मद्य आहे. मद्य विक्रेता प्रशांत यादव माळी यास मद्यासह अटक करण्यात आले आहे.
पोहेकॉ बापुराव पाटील यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हाची नोंद करण्यात आली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊनी प्रदीप वाल्हे, युराज नाईक, अनमोल पटेल, राहुल सोनवणे, बापुराव पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.