85 वर्षांनंतर इतिहासाच्या उंबरठ्यावर भारतीय क्रिकेट संघ

0

पल्लेकेले । श्रीलंकेच्या प्रदीर्घ दौर्‍याची चांगली सुरुवात करणार्‍या भारतीय संघाचे आता तिसरा कसोटी सामना जिंकण्याचे लक्श्य असेल. तिन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून याआधीच मालिका खिशात घातली आहे. शनिवारपासून सुरू होणारा मालिकेतील शेवटचा आणि तिसरा सामना जिंकल्यास भारतीय संघाचे ते ऐतिहासिक यश असेल. दीर्घ काळानंतर कसोटी संघात आलेल्या शिखर धवनच्या तुफानी खेळीमुळे भारताने पहिला सामना जिंकला होता. रनमशिन चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्य रहाणेचे शतक आणि रवींद्र जडेजाच्या अष्टपैलू खेळामुळे भारताने दुसरा सामना एक डावाच्या फरकाने जिंकला होता. आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे रविंद्र जडेजावर एका सामन्याची बंदी आहे. पहिल्या सामन्यातील दुसर्‍या डावात अर्धशतक झळकवणार्‍या अभिनव मुकुंदच्या जागेवर दुसर्‍या सामन्यात केरळचा लोकेश राहुल खेळला होता. राहुलने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलत कोलंबो कसोटीत चांगली खेळी केली. श्रीलंकेच्या खेळाडूंच्या मागे दुखापतींचा ससेमिरा लागला आहे.

85 वर्षांच्या इतिहासात भारताला परदेशात फक्त एकदाच कसोटी मालिकेतील तिन सामने जिंकता आले आहेत. मंसूर अली खान पतोडीच्या नेतृत्वाखाली फेब्रुवारी-मार्च 1968 मध्ये भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडला त्यांच्याच मैदानावर 3-1 असे हरवले होते. या दौर्‍यात भारताने ड्युनेडिनमध्ये पहिली कसोटी जिंकली होती. क्राइस्टचर्चमधील दुसर्‍या सामन्यात भारत पराभूत झाला. भारताने वेलिंग्टन आणि ऑकलंडमधील सामने जिंकले होते.

उभय संघ
भारत : शिखर धवन, लोकेश राहुल, चेतेश्‍वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्‍विन, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी, उमेश यादव, अक्षर पटेल, अभिनव मुकुंद, रोहित शर्मा, कुलदीप यादव, भुवनेश्‍वरकुमार, इशांत शर्मा

श्रीलंका : दीमुथ करूणारत्ने, उपुल थरंगा, दिनेश चंडीमल, अँजोलो मॅथ्यूज, निराशेन डिक्वेला (यष्टिरक्षक), धनंजय डिसिल्वा, दिलरुवन परेरा, मलिंडा पुष्षककुमार, दुश्मांथा चमेरा, लक्ष्मण सँडकन, लाहिरू कुमारा, विश्‍व फर्नांडो, लाहिरू थिरमाने.