चाळीसगाव । येथील बस स्टँड जवळील पार्सल ऑफिस शेजारुन अज्ञात चोरट्याने 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:30 ते दुपारी 1 वाजेदरम्यान चोरुन नेली होती. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीसांनी तपास करुन 4 अल्पवयीन चोरट्यांना मोटारसायकलसह 18 फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतले आहे.
सुनील विठ्ठलराव वाबळे रा. जहागिरदार नगर चाळीसगाव हे दिनांक 15 फेबु्रवारी रोजी येथील बस स्टँडमध्ये नातेवाईकांना सोडण्यास गेले होते. त्यांनी त्यांची मोटारसायकल क्र. एम.एच.19 ए के 4384 ही पार्सल ऑफीस जवळ लावलेली होती. ही मोटरसायकल अज्ञात चोरट्याने सकाळी 11ः30 ते 1 वाजेदरम्यान चोरुन नेली होती. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता. शहर पोलीस स्टेशनचे डिबीचे हवालदार शशिकांत पाटील, पो.कॉ. राहुल पाटील, बापूराव पाटील, गोवर्धन बोरसे, संदीप जगताप, गोपाल बेलदार यांनी पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत व पोउनि विजयकुमार बोत्रे यांचे मार्गदर्शनाखाली गोपनीय माहीतगार याने दिलेल्या माहिती वरुन शनिवारी 18 रोजी मोटारसायकल चोरणारे आरोपी सचीन राजेंद्र मिस्तरी (17) रा. साने गुरुजी नगर, सौरभ प्रमोद जाधव (17) घाटे चाळ, भूषण देविदास शिंगटे (17) शिंगटे मळा, आकाश रविंद्र मऱाठे (17) रा चैतन्य हॉस्पिटल जवळ सर्व रा चाळीसगाव यांना मोटारसायकल सह ताब्यात घेण्यात आले आहे.