ड्राय डे’ चा फज्जा, मतदानाच्या दिवशी सर्रास मद्य विक्री

0

जळगाव । राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगर पालिकेची निवडणुक सध्या सुरु असुन पहिल्या टप्प्यातील 15 जिल्हा परिषद व 165 पंचायत समितीची निवडणुकीसाठी गुरुवारी 16 फेबु्रवारी रोजी मतदान घेण्यात आले. निवडणुक काळात राजकीय पक्षाकडू मतदारांना पैसे, मद्य वाटप करण्याचे प्रकार सर्रासपणे होत असते. मद्यपींकडून निवडणुक प्रक्रिये दरम्यान अनुचित प्रकार घडु नये यासाठी शासनाने मतदानाच्या एक दिवस आगोदर, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी व निकालाच्या दिवशी असे तीन दिवस मद्यविक्रीवर निर्बध घातले होते. शासनातर्फे तीन दिवस ‘ड्राय डे’ घोषीत करण्यात आले. मात्र खेडे गावात सर्रासपणे मद्यविक्री होतांना दिसून आली. त्यामुळे ‘ड्राय डे’ चा फज्जा उडाल्याचे दिसुन आले. मतदानाच्या दिवशी काही मतदान केंद्रावर मद्यपींनी गोंधळ घातल्याचा प्रकार दिसुन आला. प्रशासनातर्फेे पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 15, 16, 23 फेबु्रवारी असे तीन दिवस हॉटेल्स, स्टॉरंटमध्ये मद्यविक्रीवर बंदी आणण्यात आली.

मद्यविक्रेत्यांचा विरोध
निवडणुक काळात कोणतेही अनुचित प्रकार घडु नये यासाठी शासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात आले. आचारसंहिता उल्लंघन करणार्‍यांवर प्रशासन नजर ठेवुन होते. मत मिळविण्यासाठी प्रलोभन दाखवितांना आढळल्यास कडक कारवाईचे आदेश देण्यात आले होते. निवडणुक प्रक्रियेतील तीन दिवस मद्यबंदी लागु करण्यात आली होती. याला मद्यविक्रेत्यांनी विरोध दर्शविला. व्यवसाय करणाच्या अधिकारावर शासन गदा आणत असल्याने मद्य व्यावसायिकांनी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने याबाबत व्यावसायिकांच्या बाजुने निकाल दिला. मतदानाच्या एक दिवस अगोदर व निकालाच्या दिवशी असलेली मद्यविक्री बंदी न्यायालयाच्य आदेशान्वये रद्द करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी व निकालापर्यत ‘ड्राय डे’ लागु असणार आहे.