नवापूर: अग्रवाल समाज आयोजित मांडवी येथील दिव्य ज्योती ट्रस्टच्या सहकार्याने ऩवापूर येथे नेत्र तपासणी शिबिर आयोजन करण्यात आले होते यात डॉ.कैवन शाह यांनी आपले सहकारी अल्पेश मिस्री, चिराग टेलर, रोमन मैसुरिया, विशाल शाह, हेतल चौधरी, सहेली गावीत, भव्य मेहता, दिपक प्रजापती, गीजु चौधरी यांच्या सहकार्याने सुमारे ३४२ रूग्णांची तपासणी केली. यात बालक, युवक व वयोवृध्द नागरिकांनी डोळयांची यशस्वी तपासणी केली. यातुन ६० रूग्नांना ऑपरेशन साठी मांडवी येथे पाठविण्यात येणार असुन त्यांचा येण्याजाण्याची व्यवस्था मोफत केली गेली आहे.
ग्रामीण भागातील रुग्णांनी केली गर्दी
अग्रवाल भवनात डोळे तपासणीसाठी शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांनी गर्दी केली होती. सकाळी ९ ते २ दरम्यान मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यात आली. आलेल्या सर्व रूग्णांसाठी अग्रवाल समाजाच्या वतीने अल्पोपहार तसेच दुपारच्या जेवनाची व्यवस्था देखील केली होती. यावेळी रुग्णांना कोणतीही अडचण निर्माण न झाल्याने आयोजकांचे आभार मानले. तसेच कँसर, एचआयव्ही, किडनी फेल आदी आजारांची तपासणी चिंचपाडा मिशन हॉस्पीटलचे डॉ.डेनीयल के., येरुशा डेनीयल यांनी केली. सदर तपासणी शिबीर यशस्वी होण्यासाठी समाजाचे अध्यक्ष सुभाष अग्रवाल, डॉ.जयेश अग्रवाल, संजय अग्रवाल, मनिष अग्रवाल, अजय अग्रवाल, अमित अग्रवाल, सुरेखा अग्रवाल, विमला अग्रवाल, गीता अग्रवाल, शितल अग्रवाल, आदिती अग्रवाल, निकिता अग्रवाल आदिंनी परिश्रम घेतले.