नवापूर: तापी (गुजरात) जिल्ह्य़ात स्वच्छता अभियाना अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नवापूर शहरातील डॉ. जयेशभाई अग्रवाल यांना सन 2016-17 च्या कार्यकल्प पुरस्कार प्रदान करण्यात आला. व्यारा येथील श्मामाप्रसाद सभागृहात झालेल्या समारंभात मार्ग वाहन व्यवहार निगमचे मंत्री कुवरजी हलपती यांच्या हस्ते डॉ. अग्रवाल यांना कार्यकल्प पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आ. कांतीभाई गावीत, आ. मोहनभाई धोडीया, जिल्हाधिकारी बी. सी. पटनी उपस्थित होते.
डाॅ. अग्रवाल यांनी तापी जिल्ह्यातील गाव पाड्यावर जाऊन स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविले. तसेच स्वच्छतेबाबत या भागात जनजागृती पर कार्यक्रम घेतले. स्वच्छता व आरोग्याचे महत्त्व लोकांना पटवून दिले. विविध आरोग्य शिबीरे त्यांनी यशस्वीपणे राबविली. त्याची दखल शासनाने घेऊन त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नवापूर शहरात सुध्दा समाजकार्य करत नेञतपासणी शिबीर आयोजित करून स्तुत्य उपक्रम त्यांनी यशस्वीपणे पार पाडले आहेत. तापी जिल्ह्यात तिसर्या क्रमांकाचा हा पुरस्कार देऊन शासनाने त्यांचा कार्याचा गौरव केला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे